गुंतवणूक करताना होणाऱ्या 30 चुका ( Investing Mistakes)
नमस्कार,
मला आलेल्या अनुभवातून गुंतवणूक करताना काय चुका होतात हे अगदी सोप्या आणि सरळ भाषेत लिहित आहेत. सर्वांनी खालील चुकांमधून शिकून योग्य तो निर्णय आपल्याल जीवनात घ्यावा हि आशा .
1) आपल्या आजी-आजोबांच्या / पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून FD, RD किंवा GOLD या सारख्या महागाईपेक्षा कमी परतावा देणाऱ्या पारंपारिक साधनात गुंतवणूक करणे.
२) फक्त रियल इस्टेट मध्येच पैसे गुंतवणे. स्व:ताचे घर सोडून गुंतवणूक म्हणून रियल इस्टेट मध्ये कधीही पैसे गुंतवू नका कारण ती सर्वात illiquid मालमत्ता आहे म्हणजे लवकर कॅश मध्ये न रुपांतरीत होणारी.
३) गुंतवणूक करण्यासाठी बराच वेळ थांबणे आणि वयाच्या शेवटी ४५ नंतर गुंतवणूक चालू करणे.
४) प्रत्येक दिवाळीला Physical गोल्ड खरेदी करणे.
५) मुख्य गुंतवणूक म्हणून सगळे पैसे fixed deposit (FD) मध्ये ठेवणे.
६) गुंतवणूक आणि विमा यांचे मिश्रण असलेल्या Policies वारंवार खरेदी करत राहणे जे कधीही महागाईपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाही.
७) जीवन विमा (Life insurance) आणि आरोग्य विमा (Health Insurance) नसणे आणि असला तरी फक्त २ ते ५ लाखाचा असणे.
८) गृह कर्जेसारख्या (Home Loan) उद्दीष्टांसाठी मोठे कर्ज घेणे पुढील २० वर्षाच्या हप्त्यावर(EMI).
९) मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीपीएफ,गरज नसलेल्या विविध
विमा पोलिसी मध्ये फक्त कर बचतीसाठी (Tax Saving) पैसे टाकणे.
भारतामध्ये ऐवढे चांगले कर बचतीचे पर्याय असताना सोडून.
१०) EPF (Employee Provident Fund) कडे सेवानिवृत्ती
नियोजन (Retirement Planning) म्हणून बघणे.
११) महागाईकडे दुर्लक्ष करणे: विचार करणे महागाई हा
एक काल्पनिक शब्द आहे ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही
१२) लक्ष्य-आधारित (Goal Based Investing) गुंतवणूक
न करणे.
१३) अश्या पोलिसीमध्ये किंवा Product मध्ये गुंतवणूक करणे जे तुम्हाला अजिबात समजत नाही.
१४) गुंतवणूक करण्यासाठी नेहमी योग्य वेळेची वाट पाहत बसून काहीच गुंतवणूक न करणे.
१५) पैशांना लॉक करणे कधीही चांगले अन्यथा ते खर्च होतील अशी खोटी समजूत आपल्या मनाशी घालून पुढील २० वर्षासाठी अडकून बसने.
१६) अजिबात knowledge नसताना Direct शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक म्युचुअल फंडापेक्षा चांगली असे समजणे.
१८) सेवानिवृत्तीच्या नियोजनाची चूक - खर्चाची काळजी घेण्यासाठी निश्चित उत्पन्न पुरेसे असेल
१९) ‘गुंतवा(Invest) आणि विसरा(Forget)' ह्या
रणनीतीचे कधीही अनुकरण न करणे
२०) एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवणे जसे FD किंवा Real Estate.
२१) आपली lifestyle (जीवनशैली) वाढवण्यासाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी सगळ्या वस्तु EMI आणि Credit Card वर घेणे तसेच क्रेडीट कार्ड चे Statement कधीही न पाहणे. पगार जसा वाढला कि जुन्या गाडी वरून नवी गाडी घेणे गरज नसताना किंवा 1 BHK वरून २ BHK वर जाने.
२२) चक्रवाढ व्याजाचा फायदा काय आहे हे माहित असूनपण त्याच्याकडे दुर्लक्षित करणे.
२३) कोठेतरी काहीतरी Discount % भेटतो (जसे amazon, Flipkart ,Mall) म्हणून गरज नसलेल्या वस्तु खरेदी करणे .
२४) आठवड्याच्या प्रत्येक रविवार कसलेही नियोजन न करता जास्तीत जास्त खर्च करणे .
२५) आपण रोज काय खर्च करतो याची कोठेही नोंद नसणे.
२६) अचानक उदभवलेल्या परिस्थितीसाठी लागणारा Emergency Fund नसणे.
२७) कष्टाने कमवलेले सर्व पैसे एका दिवसाच्या लग्न समारंभासाठी खर्च करणे .
२८) आपल्या कुटुंबासोबत पैश्याविषयी चर्चा न करणे किंवा त्यांना त्याची जाणीव न करून देणे. जसे आपल्यासाठी फमिली डॉक्टर असतो तसा आपल्यासाठी एखादा आर्थिक सल्लागार नसणे.
२९) गुंतवणूक करताना २, ३ वर्षासाठी करणे ,संयमाचा अभाव असणे , २ वर्षात दुप्पट होणारया योजनात पैसे गुंतवणे किंवा ज्यांचा गुंतवणुकीबद्दल काही अभ्यास नाही अश्यांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करेन जसे मित्र, नातेवाईक, शेजारचा.
३०) सगळ्यात म्हत्वाचे तुम्ही कितीही ऊच्च शिक्षण घेऊन ,आर्थिक शिक्षणाचा अभाव असणे .
वरील लेखात गुंतवणूक करताना होणार्या चुका आपण पहिल्या , पुढील लेखात आपण योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कसे करावे याबद्दल पाहणार आहोत.
वरील लेखात गुंतवणूक करताना होणार्या चुका आपण पहिल्या , पुढील लेखात आपण योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कसे करावे याबद्दल पाहणार आहोत.
धन्यवाद
लेख-धीरज भराट
आर्थिक सल्लागार
Note - वरील सर्व मुद्दे सामान्य माणसाला आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने post केलेले आहे तरी गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा जरुरू करावी.
मिशन - सामान्य मराठी माणसाला आर्थिक शिक्षण देऊन , आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे.
'गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य' ह्या Facebook पेज ला Like, Follow करायला विसरू नका तसेच आमच्या whatsapp Broadcast ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp Icon वर click करा.
Post a Comment