रिटर्न ऑफ प्रीमियम TROP असा टर्म प्लॅन तुम्ही घेतला पाहिजे का ?

          भारतातील विमा कंपन्या आता अनेक प्रकारच्या जीवन योजना ऑफर करतात त्यातील एक जास्तीत जास्त प्रीमियम मिळावे म्हणून TROP रिटर्न ऑफ प्रीमियम असा एक प्रकार टर्म प्लॅन मध्ये आणला गेला. पहिल्यांदा एखाद्याने हा प्लॅन पहिला तर खूप आकर्षक आणि फायद्याचा वाटतो पण प्रत्यक्षात बघितले गेले तर फायदा कमी आणि तोटा जास्त आहे या प्लॅन मध्ये .

TROP रिटर्न ऑफ प्रीमियम हा टर्म इन्शुरन्स प्लॅनचा एक प्रकार आहे परंतु स्टँडर्ड टर्म प्लॅनच्या तुलनेत एक महत्त्वाचा फरक आहे. स्टँडर्ड टर्म इन्शुरन्समध्ये, पॉलिसीधारक पॉलिसीच्या कालावधीत जिवंत राहिल्यास त्याला काहीही मिळत नाही.

 परंतु टीआरओपीमध्ये, पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या कालावधीत टिकून राहिल्यास पॉलिसीधारकाने वर्षानुवर्षे भरलेला प्रीमियम परत भेटतो. ज्यांना असे वाटते की 60-65 वर्षापर्यंत प्रीमियम भरून आपल्याला काही झाले नाही तर काहीतरी तरी भेटले पाहिजे अश्याप्रकारचे लोक यामध्ये फसले जातात .





 

उदाहरण:-

 

1) Mr. Ravi हे एक करोड रुपयाचा रिटर्न ऑफ प्रीमियम (TROP) असा प्लॅन  65 वयापर्यंत खरेदी करतात.


Mr. Ravi यांचे वय – 30 वर्ष

✅पॉलिसी कालावधी – 35 वर्ष

✅रिटर्न ऑफ प्रीमियम – 30000 / वर्षाला

✅Pure टर्म प्लॅन प्रीमियम – 13000 / वर्षाला

 

Mr. Ravi यांनी रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन घेतला तर त्यांची रक्कम एक Pure टर्म प्लॅन च्या तुलनेत जवळपास दुप्पट जाते .

 

रिटर्न ऑफ प्रीमियम मध्ये जर 65 वर्षापर्यंत त्यांना काही झाले नाही तर जीवन विमा कंपनीकडून 9 लाख रुपये भेटतील . आता दुसरी बाजू बघूया .....

 

2) Mr.Ravi यांनी एक करोड रुपयाचा Pure टर्म प्लॅन खरेदी करतात.


    वर्षाचे प्रीमियम -13000 रुपये .

    65 वर्षापर्यंत त्यांना काही झाले नाही तर एकही रुपया विमा कंपनी देणार नाही .

 

तुम्ही कोणता प्लॅन खरेदी करावा ?

 

उत्तर – नेहमी Pure टर्म प्लॅन खरेदी करा .

 

उदाहरणावरून चला तर पाहूया :-

 

1)    रिटर्न ऑफ प्रीमियम (TROP) प्लॅन

 

Mr. Ravi यांचे वय – 30 वर्ष

✅पॉलिसी कालावधी – 35 वर्ष (वयाच्या 65 वर्षापर्यंत )

✅रिटर्न ऑफ प्रीमियम – 30000 / वर्षाला

✅काही नाही झाले तर 65 वर्षांनंतर मिळणारी रक्कम – 9 लाख रुपये .

( तुम्हीच भरलेले पैसे तुम्हाला रिटर्न च्या स्वरुपात देत आहेत ).

 

 

➖2)    Pure टर्म प्लॅन-


Mr. Ravi यांचे Pure टर्म प्लॅन मध्ये प्रीमियम 13000 आहे.

      रिटर्न ऑफ प्रीमियम (TROP) 30000 - Pure टर्म प्लॅन 13000 =17000 रुपयाची वर्षाला बचत होते .

आता हे वाचलेले 17000 रुपये आपण एखाद्या चांगल्या म्यूचुअल फंड मध्ये पुढील 35 वर्ष ठेवले तर 10% रिटर्न ने सरासरी 48 लाख रुपये जमा होतात .

तुम्ही प्युअर टर्म प्लॅन खरेदी केल्यास प्रीमियम कमी असेल.तसेच तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात अतिरिक्त पैसे गुंतवले आणि ते दीर्घ काळासाठी सोडले तर रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅनवर तुम्हाला जितके पैसे मिळतील त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे तुमच्याकडे असतील.

 इथे एक लक्षात घेतले पाहिजे टर्म इन्शुरेंस हा एक आपला खर्च आहे. आपण हयात नसलो तर कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी आपण हा जीवन विमा घेतो. यामध्ये परतावा शोधू नका जिथे चांगले गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहे तिथे SIP पद्धतीने महिन्याला गुंतवणूक करत चला .


निष्कर्ष:-


👉  Pure टर्म प्लॅन घ्या

👉  रिटर्न ऑफ प्रीमियम (TROP) चा प्लॅन घेऊन विनाकारण जास्तीचे पैसे देऊ नका .

👉  जेवढी गरज चे  तेवढेच प्रीमियम जीवन विमा कंपन्यांना द्या .

👉  जे जास्तीचे पैसे रिटर्न ऑफ प्रीमियम मध्ये देणार होते तेच पैसे म्यूचुअल फंड मध्ये गुंतवा .

👉  जास्तीत जास्त टर्म प्लॅन 60 किंवा 65 वर्षापर्यंत घ्या . उगाच 100 वर्षापर्यंत घेऊन प्रीमियम        वाढवू नका .

👉  नोकरीला लागल्यावर तसेच जबाबदारी तुमच्यावर असेल तर पहिले कुटुंबासाठी  टर्म प्लॅन काढून घ्या .

 

 

धन्यवाद 🙏

धिरज भराट
IRDAI  नोंदणीकृत  विमा सल्लागार )

अर्थफ्रीडम

Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे. तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post