Sovereign Gold Bond सॉवरेन गोल्ड बॉन्ड

सोने खरेदीसाठी सर्वात उत्तम गुंतवणुकीचा प्रकार

Why Sovereign Gold Bond Scheme is one of the best ways to buy or invest in Gold?

 नमस्कार ,

आज आपण सोने खरेदी करण्याचा भारतातला सर्वात उत्तम प्रकार पाहणार आहोत.

भारतात दोन प्रकारचे लोक सोन खरेदी करतात एक जे आवड म्हणून, दिखावा करण्यासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी कामाला येईल म्हणून आणि दुसरे असतात गुंतवणूकदार जे परताव्या (Return) साठी सोन्यामध्ये मध्ये गुंतवणूक करतात.

सर्वसामान्य गुंतवणूकदार Physical गोल्ड खरेदी करतो ज्यात खलील जोखीमनेहमी असते.

1) MAKING CHARGES RISK - गोल्ड डिजाइन करण्यासाठी लागणारा खर्च physical gold मध्ये समाविष्ट केलेला असतो .

2) STORAGE RISK AND COST - घरात जास्त सोन असेल तर एक प्रकारची जोखीम असते आणि बँकेत ठेवले तर त्यांना वार्षिक काही फी द्यावी लागते.

3) DESIGN CHARGESजसे आपण वर सोने खरेदी करताना Design charges घेतले जातात तसेच  जर आपण घेतलेले सोन्याची Design जर जुनी झाली तर ती मोडण्यासाठी आलेला खर्च वेगळा द्यावा लागतो.

4) PURITY RISK - Physical - सोने खरेदी करताना किती शुद्ध (Pure) आहे त्याची एक जोखीम असते . तसेच आपण जर त्याला काही वर्षानी पॉलिश केली तर त्यासाठी वेगळा खर्च द्यावा लागतो.

5) TAX – सोने खरेदी केले तर त्यावर 3% GST ही आपल्याला द्यावा लागतो आणि उद्या सोन्याचे भाव वाढतील म्हणून आजच आपण सोन घेऊन त्याला lock करतो.


वरील सर्व सोन्यासाठी लागणार्‍या खर्चावर उपाय म्हणजे Digital Gold – Sovereign Gold Bond


सॉवरेन गोल्ड बांड म्हणजे काय ?

             जसे आपण physical सोन खरेदी करतो तसेच इथे Digital स्वरुपात सोने खरेदी होते . Govt. backed ही एक Security आहे ज्याची एका यूनिट ची किमत आहे – 1 ग्राम सोन आणि हे 1 ग्राम सोने आपण घेतो 24 कैरट सोन (Purity 999 Gold). 24 कैरट सोन म्हणजे आज असलेला सोन्याचा भाव. Sovereign Gold Bond ला RBI ( Reserve Bank of India ) इश्यू करतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या पैश्याची काळजी करण्याची गरज नाही . Sovereign Gold Bond मध्ये भारत सरकारची हमी असते . आता यामध्ये कसा फायदा होतो ते समजून घेऊया.

       समजा आज तुम्ही Sovereign Gold Bond चा 1 यूनिट खरेदी केला म्हणजे 1 ग्राम सोन आणि आता सोन्याचा भाव समझा रुपये 4800 ग्राम चालू आहे आणि भविष्यात तुम्ही म्हणजे 5-6 वर्षानी सोन्याचा भाव 6000 (Capital Appreciation ) जातो म्हणजे 1200 रूपये एका ग्राम मध्ये फायदा झाला बरोबर पण याशिवाय तुम्हाला 2.5% ( Simple interest P.A ) व्याज प्रत्येक वर्षाला भेटते जे फक्त ‘सॉवरेन गोल्ड बांड ‘मध्ये आहे. त्यामुळे हा एक वेगळा आणि सर्वात उत्तम सोने गुंतवणुकीचा प्रकार समजला जातो

याशिवाय अजून खूप फायदे आहेत याचे ते आपण खाली पाहू ,पण हा एकच असा गुंतवणुकीचा प्रकार आहे ज्यात एकाच ठिकाणी येवढे गुंतवणुकीचे फायदे आहेत.


सॉवरेन गोल्ड बॉन्ड चे फायदे :



  •  No Design Making Charges -  SGB मध्ये तुम्हाला कोणतेही डिजाइन बनवण्याचा खर्च द्यावा लागत नाही जो की तुम्हाला physical Gold खरेदी केल्यावर द्यावा लागतो जसे तुम्ही दुकानातून बाहेर पडता तसे 15 ते 20% रक्कम तशीहि कमी झालेली असते.
  •  No Storage Risk & Cost :- physical gold मध्ये असलेल सोन खूप जोखमीचे मानले जाते कारण त्यात चोरी होण्याची शक्यता जास्त असते आणि बँकेत लॉकर मध्ये ठेवले तर काही फी बंकेला द्यावी लागते पण SGB मध्ये 1% ही अशी जोखीम नसते कारण आपण ते Electronic खरेदी करतो .
  •  No Impurities – जेव्हा आपण physical gold खरेदी करतो तेव्हा आपल्या 22 कैरट मध्येच शक्यतो भेटते आणि SGB यामध्ये अश्याप्रकारची पण Risk नाही की सोनाराने संगितले 24 कैरट आणि आपल्याला दिले 20 कैरट. म्हणजे SGB मध्ये 100% 24 कैरट मध्येच Electronic सोने खरेदी होते .
  •  No Default & Safety Risk – RBI (Reserve Bank of India) ने SGB इश्यू केल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची पैसे गमवण्याची किंवा काही घोटाला होण्याची जोखीम नाही कारण भारत सरकारची (Government of India ) यात खात्रीशीर हमी असते .
  •  NO GST OR STT – SGB खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा GST Tax किंवा STT ( Security Transaction Tax ) द्यावा लागत नाही तेच जर आपण physical Gold खरेदी करायला गेलो तर तिथे 3% GST आणि shares खरेदी करताना STT द्यावा लागतो.
  •  NO CAPITAL GAIN TAX AFTER 8 YEARS – SGB मध्ये Maturity पर्यंत म्हणजे 8 वर्षापर्यंत गुंतवणूक ठेवली तर यावर कोणताही Capital Gain Tax लागत नाही. त्या आधी काढला तर लागू होतो.
  •  COLLATERAL FOR LOANS – जसे तुम्ही physical gold गहाण ठेवून कर्ज ( Loan ) घेता तसे इथे पण तुम्हाला SGB वर कर्ज घेता येते.
  • GOOD LONG TERM RETRUNS-  SGB मध्ये दीर्घवधी मध्ये आपण 8-10% परतावा अपेक्षित करू शकतो त्याच बरोबर Government प्रत्येक वर्षी  2.50% व्याज तुमच्या account वर Credit करते जे तुमहाला सोन्याच्या दुसर्‍या गुंतवणुकीच्या प्रकारा मध्ये नाही भेटत.
  •  DEMAT FORM – SGB हे DEMAT ACCOUNT वर खरेदी – विक्री करू शकता ज्यात कागदपत्रे हरवण्याची भीती राहत नाही .
  •  TRADABLE ON EXCHANGES - SGB हे stock Exchanges वर Tradable आहे म्हणजे जर तुम्हाला 5 वर्षाच्या आत हे Bonds विकायचे असतील तर तुम्ही विकू शकता. त्यामुळे नेहमी SGB नेहमी Demat form मध्ये खरेदी करावे.

 
Sovereign Gold Bond bonds ठराविक कालावधीनंतर RBI Issue करते. वर्षभरात 5-6 वेळेस हे Bonds खरेदी साठी उपलब्ध असतात आणि तसेच आपण केव्हाही या मध्ये Demat ने खरेदी – विक्री करू शकतो. सध्या तुम्ही  खलील  चार्ट नुसार खरेदी करू शकता


    Gold मध्ये गुंतवणूक करायची असेल तर physical gold घेणे बंद करून नवीन smart पद्धतीने gold खरेदी करा. तुमच्यासाठी कोणती गुंतवणूक योग्य राहील तसेच किती प्रमाणात (%) व कसे gold घेतले पाहिजे हे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारला विचारा किंवा काही मदत आमच्याकडून लागली तर तुम्ही  Whatsapp वर मेसेज करू शकता तसेच असेच लेख आणि गुंतवणुकीबद्दल माहिती मिळवण्यसाठी आमच्या whatsapp boradcast ला जॉइन करा ( Whatsapp link - https://wa.link/1emxoy )


धन्यवाद.
लेख- धिरज भराट
( Financial Freedom Coach )


मिशन - आम्ही लोकांना सरळ व सोप्या भाषेत आर्थिक शिक्षण देण्याच्या मिशन वर आहोत आणि आमच्या स्वातंत्र्य मनी मॅनेजमेंट प्रक्रियेमार्फत त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि तणाव - मुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम बनवत आहोत..


 Note - इथे मी माझे वैयक्तिक अनुभव मांडत आहे. ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

Post a Comment

Previous Post Next Post