प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी आपले स्वप्नातील घर घेतो आणि त्यासाठी तो जवळपास २० वर्ष काम करून घराची मुद्दल (Principle ) आणि व्याज ( Interest ) फेडत असतो पण तुम्ही कधी विचार केला आहे कि आपण जे होम लोन चे व्याज बँकेला देतो ते जर वाचवता आले तर ? हो बरोबर ऐकले आहे तुम्ही आपण होम लोन वरचे जे व्याज आहे ते आपण वाचवू (Save) शकतो ते कसे चला तर पाहूया ...
एखादा व्यक्तीचे ज्यावेळेस नोकरीला लागून लग्न होते त्यावेळेस त्याचा मनामध्ये पहिला कसला विचार येत असेल तर स्वत: साठी एक छानसे घर असावे आणि आपण सर्वाना माहितच आहे कि होम लोन मिळणे किती सोपे झाले आहे तसेच आता सर्व तसे online झाले आहे त्यामुळे एखादा सामान्य माणूस या होम लोन च्या चक्र्व्हू मध्ये अगदी अलगद अडकत चालला आहे.
होम लोन हा एक आयुष्यातला खुप मोठा निर्णय आहे कारण त्याचे व्याज आणि मुद्दल आपल्याला १ वर्ष किंवा २ वर्ष फेडायचे नसून तब्बल २० वर्ष परतफेड करायची आहे मग तुमची नोकरी किंवा व्यवसाय असू किंवा नसू तुम्हाला तर २० वर्ष तर लोन फेडायचे आहे. घर घेण्याचा विचार करताना, होम लोन किती घ्यावे ही बाब सर्वात महत्त्वाची असते. यातील महत्त्वाचे पैलू हे की, ईएमआयची रक्कम किती असावी आणि सध्याचे मासिक उत्पन्न लक्षात घेता ती रक्कम परवडू शकेल का, याचा विचार करावा.
उदाहरण :-
रमेश नावाच्या व्यक्तीने २० लाख रुपयाचे होम लोन ७.५% व्याजाने पुढील २० वर्षासाठी घेतले जो कि त्याचा महिन्याचा EMI रु १६११२ आहे.
खाली दिलेलेया फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता .
सोपे आहे रमेश ने अस समजायचे कि त्याच्या होम लोन चा EMI रु १६१२२ नसून १८००० ( Round up ) आहे जो कि आपण १२% वाढवला आहे ( EMI १६१२२ x १२% (१९३५ ) = १८०५७ .
१२% वाढलेली रक्कम रुपये २००० प्रत्येक महिन्याला एका चांगल्या Diversify म्युचुअल फंडात SIP ( Systematic Investment plan ) माध्यमाने गुंतवणूक करत राहणे कारण दीर्घ काळामध्ये म्युचुअल फंडामध्ये मिळणारा परतावा हा कधीही बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त असेन . ज्यांना म्युचुअल फंड म्हणजे काय माहित नाही त्यांनी येथे click करावे .
चला आपण असे समजू कि म्युचुअल फंड मध्ये आपल्याला पुढील २० वर्षामध्ये १२% सरासरी परतावा भेटत आहे तर आपण महिन्याला SIP ने गुंतवलेल्या २००० च्या रकमेचे मुल्य किती असेन ?
महिन्याला गुंतवणूक ( SIP ) = २०००
वर्ष – २०
परतावा – १२ % सरासरी
खाली दिलेल्या फोटो मध्ये पहा .

वरील फोटो नुसार जर रमेश २००० ची SIP पुढील २० वर्षासाठी करतो तर त्याच्याकडे जवळपास चक्रवाढ व्याजामुळे १९.७९ लाख जमा होतात .
सुरवातीला पाहिल्यानुसार रमेच्या व्याजाची रक्कम १८.६७ लाख होती आणि रमेशकडे आता १९.७९ लाख जमा झाले .
२००० रुपये SIP चे मुल्य १९.६९ लाख – बँकेचे व्याज १८.६७ = १.१२ लाख
म्हणजे रमेश बँकेला मुद्द्लावरचे जाणारे व्याज एका २००० च्या SIP मुळे वाचवू शकला जे कि हि रक्कम बँकेला जाणार होती जर त्याने SIP नसती केली तर , आता हि वाचलेली रक्कम तो त्याच्या भविष्यासाठी वापरू शकतो . रमेशने सुरवातीला घेतलेला एक छोटासा निर्णय खुप मोठी रक्कम वाचवू शकला
खालील फोटो मध्ये सारांश पाहू शकता :-

आम्ही लोन घेताना काय सल्ला देतो –

धन्यवाद.
धन्यवाद.
( लेखक विमा आणि म्युचुअल फंड वितरक आहेत )
( Mutual funds are subject to market risk please read all documents carefully before investing )
Note - इथे मी माझे वैयक्तिक अनुभव मांडत आहे. ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.
खूप छान
ReplyDeleteखुपच छान आणि परिपुर्ण माहिती दिसी आहे
ReplyDeleteमस्तच...
ReplyDeletePost a Comment