HDFC ERGO Optima Secure Plus या नवीन पॉलिसीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत! 🚀
हा प्लॅन खूप युनिक आहे. यात अनेक नवीन फायदे आहेत जे तुम्ही आधी कधीही पाहिले नसतील. 😲
पहिले HDFC ERGO बद्दल थोडक्यात पाहू 👇
👉 क्लेम सेटलमेंट रेशो: ९८% ✅
👉 १६,०००+ हॉस्पिटल्सचा कॅशलेस नेटवर्क (सर्व भारतात) 🏥
👉१.५ कोटी लोक इन्शुअर्ड 👥
👉 गेल्या १५ वर्षांत २१,७०० कोटी रुपयांचे क्लेम पेड 💰
कंपनी खूप विश्वासार्ह आणि मजबूत आहे! 💪
Optima Secure Plus ची खास गोष्टी (USP):
1. Secure Benefit (SB) → SB मध्ये पहिल्या दिवसापासून २X कव्हर मिळते! 🔥 जर एखाद्याने १० लाखांची पॉलिसी घेतली असेल तर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला ₹२० लाखांचे कव्हर मिळते. (म्हणजे १० लाख × २ = २० लाख) 💯
2. Infinite Benefit (Bonus) – हा या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा आहे! 🌟 आजकाल हॉस्पिटलमध्ये उपचार, ऑपरेशन, औषधांचा खर्च दरवर्षी १०% ते १२% ने वाढत आहे. याला Medical Inflation म्हणतात. Infinite Benefit मध्ये दरवर्षी तुमचा १००% बेस सम इन्शुअर्ड वाढतो, क्लेम झाला तरीही आणि याला कोणतीही अप्पर लिमिट नाही! म्हणजे तुमचे कव्हर प्रत्येक वर्षी दुप्पट होत जाते. मेडिकल इन्फ्लेशन विरुद्ध ही सर्वोत्तम सुरक्षा आहे. 🛡️
उदाहरण : १० लाखांची पॉलिसी घेतली तर
🔥पहिल्या दिवशीच २० लाख (Secure Benefit मुळे)
🔥वर्ष १ नंतर → ३० लाख
🔥वर्ष २ नंतर → ४० लाख
🔥वर्ष ५ नंतर → ७० लाख
🔥वर्ष १० नंतर → १.२० कोटी! 🚀
ही सुविधा इनबिल्ट आहे, एक्स्ट्रा रायडर घेण्याची गरज नाही! ✅
4. Unlimited Restore Benefit → यामध्ये बेस सम इन्शुअर्ड इतका कव्हर अनेकदा रिस्टोअर होऊ शकतो! ♾️ म्हणजे तुमचे बेस कव्हर + Secure Benefit + Infinite Benefit (Bonus) हे सर्व संपले तरी अनलिमिटेड रेस्टोर बेनिफिट वापरण्यात येते.
5. ६ टियर्स → तुम्ही ज्या शहरात राहता त्यानुसार प्रीमियम (Tier 1 ते Tier 6) ठरेल. Tier 5-6 मध्ये राहणाऱ्यांना खूप स्वस्त प्रीमियम आहे! 🏙️
6. Room Rent – यामध्ये सर्व प्रकारच्या (जनरल वॉर्ड, शेअरिंग, सिंगल प्रायव्हेट AC रूम, डिलक्स किंवा सूट) रूम कव्हर होतात. कोणत्याही प्रकारचे लिमिट यामध्ये नाही! 🛏️ ( यामध्ये एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही Single AC Room घेतले तर काही प्रमाणात प्रीमियम कमी होतो)
7. Day Care Treatments - म्हणजे अशा शस्त्रक्रिया किंवा उपचार ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये २४ तासांपेक्षा जास्त राहण्याची गरज नाही. नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अनेक उपचार २४ तासांच्या आत पूर्ण होतात, याला Day Care Procedure म्हणतात.
उदाहरण : मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, डायलिसिस, केमोथेरपी इत्यादी. सर्व प्रकारचे Day Care शस्त्रक्रिया यामध्ये समाविष्ट आहेत! ⚕️
![]() |
8. Pre & Post Hospitalization - हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या ६० दिवस आधी आणि Discharge मिळाल्यानंतरचा १८० दिवसांपर्यंतचा सर्व संबंधित वैद्यकीय खर्च (टेस्ट, औषधे, डॉक्टर फी , ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI ,डायग्नोस्टिक टेस्ट,औषधे असे सर्व खर्च त्या आजाराशी संबंधित इतर वैद्यकीय खर्च कंपनी देते.
9. Emergency Road Ambulance → सम इन्शुअर्ड पर्यंत 🚑
10. Air Ambulance → ५ लाखांपर्यंत मर्यादित ✈️
11. Preventive Health Check-up – Optima Secure Plus मध्ये दरवर्षी रिन्यूअलवर तुमच्या पॉलिसीच्या साइजनुसार (५ लाख ते २ कोटी) ₹१,५०० ते ₹१५,००० पर्यंत फ्री हेल्थ चेकअपचा फायदा मिळतो! तुम्ही क्लेम घेतलेला असो किंवा नसो, हा फायदा प्रत्येक वर्षी तुम्हाला घेता येतो. 🩺
12. Modern Treatments (रोबोटिक सर्जरी) – कव्हर सम इन्शुअर्ड पर्यंत 🤖
13. No Co-payment - हॉस्पिटलचे बिल आले की इन्शुरन्स कंपनी काही % रक्कम (उदा. १०% किंवा २०%) तुम्हाला स्वतः भरण्यास सांगते. उदा. बिल ५ लाख रुपये आले आणि १०% को-पेमेंट असेल तर तुम्ही ५०,००० रुपये स्वतः द्यावे लागतात, बाकी ४.५० लाख कंपनी देते. यामध्ये कोणत्याही फरकाचे Co-payment नाही. सर्व हॉस्पिटल बिल कंपनी paid करते . ✅
14. Ayush Benefit – Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha आणि Homeopathy हे सर्व उपचार यामध्ये कव्हर होतात. 🌿
15. Home Care Benefit – असे उपचार जे तुम्ही घरीही घेऊ शकता (Dialysis, Chemotherapy) हे सर्व या पॉलिसीमध्ये कव्हर होतात! 🏠
16. Domiciliary Hospitalization – अशी परिस्थिती जिथे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा बेड उपलब्ध नाही, त्यामुळे घरात उपचार घ्यावे लागतात. या प्लॅनमध्ये अशा घरगुती उपचारांचा खर्च सम इन्शुअर्ड पर्यंत पूर्ण कव्हर केला जातो! 🛌
17. Daily Cash For Shared Accommodation - हॉस्पिटलचे बिल आले की इन्शुरन्स कंपनी काही % रक्कम (उदा. १०% किंवा २०%) तुम्हाला स्वतः भरण्यास सांगते. उदा. बिल ५ लाख रुपये आले आणि १०% को-पेमेंट असेल तर तुम्ही ५०,००० रुपये स्वतः द्यावे लागतात, बाकी ४.५० लाख कंपनी देते. यामध्ये कोणत्याही फरकाचे Co-payment नाही. सर्व हॉस्पिटल बिल कंपनी paid करते .
18. E-Consultations – ५१ प्रकारच्या लिस्टेड Critical Illnesses साठी तुम्ही डॉक्टरांचे E-Consultations घेऊ शकता! 📱
19. OPD Cover – यासाठी Optima Wellbeing Rider घेता येतो. हा रायडर पॉलिसी व्यतिरिक्त घ्यावा लागतो. OPD साठी लागणारे खर्च यामध्ये समाविष्ट होतात! 👨⚕️
20. Deductible - डिडक्टिबल ही एक ऐच्छिक (optional) सुविधा आहे. यामध्ये तुम्ही पॉलिसीचे प्रीमियम 65% पर्यंत कमी करू शकतात. Deductible म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये Admit झाल्यावर पहिल्या काही रुपयांचा खर्च तुम्ही स्वतःच्या खिशातून (किंवा दुसऱ्या इन्शुरन्समधून) करायचा असतो. त्यानंतरच HDFC ERGO कंपनी तुमच्या उरलेल्या claim चे पैसे देते . Deductible हा तुम्ही 25000,50000,1 लाख, 2लाख पर्यंत निवडू शकता . जितका जास्त डिडक्टिबल तुम्ही निवडाल, तितका तुमचा प्रिमियम (वार्षिक हप्ता) कमी होईल. समजा तुम्ही ₹50,000 डिडक्टिबल निवडला आहे आणि तुमचा बेस सम इन्शुअर्ड (Base Sum Insured) ₹10 लाख आहे.
पहिल्या वर्षात तुम्ही हॉस्पिटल मध्ये ॲडमिट झाले ज्याचे बिल 3 लाख आले तर पहिले ₹50,000 तुम्ही स्वतः भरावे लागतील उरलेले ₹2,50,000 HDFC ERGO कंपनी देईल (पॉलिसीच्या इतर नियमांनुसार). लक्षात घ्या हे फक्त वर्षातल्या पहिल्या क्लेम साठी आहे . एकाच वर्षात 2,3 क्लेम आले तर दूसरा आणि तिसर्या क्लेम मध्ये तुम्हाला कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही पूर्ण रक्कम hdfc कंपनी देईल . हा option खूप चांगला आहे ज्यांना कमी प्रीमियम मध्ये जास्त कवर पाहिजे असल्यास किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिति नाहीये ते लोक 25-50000 Decutible option निवडून 20 -40 लखाचे कवर घेऊ शकतात.
पहिल्या वर्षात तुम्ही हॉस्पिटल मध्ये ॲडमिट झाले ज्याचे बिल 3 लाख आले तर पहिले ₹50,000 तुम्ही स्वतः भरावे लागतील उरलेले ₹2,50,000 HDFC ERGO कंपनी देईल (पॉलिसीच्या इतर नियमांनुसार). लक्षात घ्या हे फक्त वर्षातल्या पहिल्या क्लेम साठी आहे . एकाच वर्षात 2,3 क्लेम आले तर दूसरा आणि तिसर्या क्लेम मध्ये तुम्हाला कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही पूर्ण रक्कम hdfc कंपनी देईल . हा option खूप चांगला आहे ज्यांना कमी प्रीमियम मध्ये जास्त कवर पाहिजे असल्यास किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिति नाहीये ते लोक 25-50000 Decutible option निवडून 20 -40 लखाचे कवर घेऊ शकतात.
उदाहरण:
•👉₹25,000 डिडक्टिबल → साधारण 22.5 % Discount
👉₹50,000 डिडक्टिबल → साधारण 40% Discount
👉 ₹1,00,000 डिडक्टिबल → साधारण 50% Discount
21. Maternity Expenses - यासाठी Parenthood नावाचा ऑप्शनल अॅड-ऑन घ्यावा लागतो. यामध्ये ₹५०,००० ते ₹२ लाखांपर्यंतचा मॅटरनिटी खर्च मिळतो. या रायडरसाठी २ वर्षांचा वेटिंग पीरियड आहे! 👶
21. Maternity Expenses - यासाठी Parenthood नावाचा ऑप्शनल अॅड-ऑन घ्यावा लागतो. यामध्ये ₹५०,००० ते ₹२ लाखांपर्यंतचा मॅटरनिटी खर्च मिळतो. या रायडरसाठी २ वर्षांचा वेटिंग पीरियड आहे! 👶
22. Waiting Period – पॉलिसी घेतल्यापासून पहिले 30 दिवस अपघातचा खर्च cover होतो . 30 दिवसांनंतर जे काही सामान्य viral आजार आहेत ते कवर होतात . तुमहाला अॅक्सिडेंट व्यक्तिरिक्त कोणतेही surgery करायची असेल ( उदाहरण - हर्निया (Hernia),पाइल्स (Piles),कॅटरॅक्ट (Cataract),टॉन्सिलाइटिस, सायन (Sinusitis),किडनी स्टोन (Kidney stones),जॉइंट रिप्लेसमेंट (Joint replacement)) तर त्यासाठी तुमच्या पॉलिसीला 2 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे
23. PED (Pre-Existing Diseases) – म्हणजे पॉलिसी घेताना आधीपासून असलेले आजार (उदा. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, थायरॉइड, हृदयरोग इ.). यासाठी ३६ महिने (३ वर्षे) वेटिंग पीरियड आहे. जर तुम्ही ABCD Chronic Care Rider (ऍड-ऑन) घेतला असेल तर अस्थमा, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल आणि डायबिटीज या ४ आजारांसाठी वेटिंग फक्त ३० दिवस आहे. बाकी PED साठी ३ वर्षे .
24. काही Optional Add-ons / Riders– हे सर्व अॅड-ऑन्स ऑप्शनल आहेत. तुम्ही सर्व घेऊ शकता किंवाकाहीही घेऊ शकत नाही.
Serious illness Booster – यामध्ये जे 9 प्रकारचे listed critical Illnesses आहेत. ज्यामध्ये तुमचे अतिरिक्त १००% कव्हर( Base Cover ) मिळते .
my:Health Critical Illness Add-on - ५१ गंभीर आजारांसाठी एकरकमी रक्कम (Lump sum).
Optima Wellbeing : OPD (बाह्य उपचार), डॉक्टर फी, टेस्ट इत्यादीसाठी.
ABCD Chronic Care Rider - अस्थमा (Asthma), ब्लड प्रेशर (Blood Pressure), कोलेस्टेरॉल (Cholesterol) आणि डायबिटीज (Diabetes) या ४ आजारांसाठी कव्हर. सामान्य प्लॅनमध्ये या आजारांसाठी ३ वर्षांचा वेटिंग पीरियड (प्रतीक्षा कालावधी) असतो.या रायडरसह फक्त ३१ दिवसांनंतर (३१व्या दिवसापासून) या आजारांचा खर्च कव्हर होतो.
Parenthood Rider - यामध्ये 50000 – 2 लाख पर्यंतचा maternity खर्च मिळतो. या rider साठी 2 वर्षाचा waiting period आहे.
25. प्रीमियम डिस्काउंट:
👉 Loyalty Discount: २.५% (जर तुमच्याकडे HDFC Ergo ची दुसरी पॉलिसी असेल).
🔥 Family Discount: १०% (२ किंवा अधिक सदस्य).
🔥 Long-term Renewal Discount: २ वर्ष – ६%, ३ वर्ष किंवा अधिक – ८%.
🔥 Favourable Claims Experience Discount: क्लेम न केल्यास १८-२१% पर्यंत सूट.
This discount depends on your claim history
No claims usually means a higher discount
Optima Secure आणि Optima Secure Plus मधील फरक (थोडक्यात):
• Secure मध्ये Infinite Benefit नव्हता, Plus मध्ये आहे!
• Restore → Secure मध्ये १ वेळ, Plus मध्ये अनलिमिटेड ♾️
• प्रीमियम टियर्स → Plus मध्ये ६ टियर्स (स्वस्त शहरात स्वस्त प्रीमियम) 🏡
ज्यांना कोणाला health insurance खरेदी करायचा आहे त्यांनी या प्लॅनचा नक्की विचार करावा .
ज्यांच्याकडे Optima Secure किंवा Optima Restore पॉलिसी आहे ते आता तरी या प्लॅन मध्ये स्विच करू शकत नाहीत पण भविष्यात लवकरच प्लॅन change करू शकतील .
धन्यवाद
Dhiraj Bharat
( लेखक विमा सल्लागार आहेत )
Arthfreedom™ Disclaimer


.png)





Post a Comment