टर्म इन्शुरन्स - भाग 2
👉किती रकमेचा टर्म इन्शुरन्स आपण घेतला पाहिजे ?1करोड?2करोड किंवा अधिक?
👉तुम्ही वयाच्या किती वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्सचे कव्हर घेतले पाहिजे?
👉टर्म इन्शुरन्स मधील रायडर्स खरेदी करायचे की नाही ?
वरील सर्वांची माहिती चला तर जाणून घेऊया ...
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
ज्यांनी पहिला भाग वाचला नसेल त्यांनी इथे क्लिक करून वाचवा :-
टर्म इन्शुरन्स हे एक शुद्ध जोखीम कव्हर🦺 आहे जे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा👨 मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला एक मोठी विम्याची रक्कम 💰देते.
यामध्ये गुंतवणूक आणि विमा असा मिक्स प्रकार नाहीये त्यामुळे तुम्हाला कमीत कमी रकमेत जास्तीत जास्त विमा कवच घेता येते. टर्म इन्शुरन्स मध्ये जर पॉलिसी मेंबर प्लॅनच्या मॅच्युरिटीपर्यंत जिवंत असेल तर त्याला कोणताही मोबदला मिळत नाही.
उदा:-
MR.X वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत २ करोड चा टर्म प्लॅन खरेदी करतात
आणि जर MR.X यांचा वयाच्या ६० वर्षापूर्वी मृत्यू झाला तर नॉमिनीला विम्याची २ करोड रक्कम मिळेल.
त्याचप्रमाणे जर Mr.X हे वयाच्या 60 वर्षापर्यंत जगले तर त्यांना कोणतेही पैसे मिळणार नाहीत आणि प्रीमियम जीवन विमा कंपनीचा नफा होईल.
👉टर्म प्लॅन कोणी घेतला पाहिजे ? Who should buy a term plan?
इथे प्रत्येकाला टर्म प्लॅन ची गरज नसते.टर्म प्लॅन खरेदी करण्याच्या काही अटी:-
✅जर तुम्ही कुटुंबातील एकमेव उत्पन्न कमवणारे सदस्य असाल तर,
✅जर तुमच्यावर कोणी अवलंबून असेल जसे पालक/मुले/घरची जबाबदारी तर ,
✅जर तुम्ही मोठे कर्ज घेतले असेल तर ,
✅जर तुमच्याकडे आर्थिक गरजेसाठी पुरेसा निधी जतन केलेला नसेल तर ,
✅तुमचे लग्न झालेले असेल तर ,
वरीलपैकी कोणत्याही अटीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही लवकरात लवकर टर्म प्लॅन खरेदी करा कारण जसजसे वय वाढत जाते तसतसे प्रीमियम वाढत जातात.
60 वर्षांपर्यंत जर पण 1cr टर्म प्लॅन घेतला तर अंदाजे किती रक्कम लागू शकते
👨तुमचे वय 30 असेल तर 10000 ते 12,000 प्रीमियम येते.
👨तुमचे वय 35 असेल तर 17,000 प्रीमियम येते.
👴तुमचे वय 40 असेल तर 20,000 प्रीमियम येते.
"लक्षात घ्या तुम्ही ज्या वयात टर्म प्लॅन खरेदी करता ते प्रीमियम लॉक होऊन पुढील 60 ते 65 वर्षापर्यंत आहे तेवढेच राहते ( health Insurance सारखे यात दरवर्षी वाढ होत नाही )"
आजार होण्याचा धोका:-😷
जसजसे तुमचे आयुष्य🧬 पुढे जात आहे रोगाचा संसर्ग होण्याचा धोका सतत वाढत आहे.
तुम्हाला जीवनशैलीचे काही आजार असल्यास, विमा कंपनी तुम्हाला संरक्षण देण्यास नकार देऊ शकते.
त्यामुळे तुम्ही निरोगी असतानाच एक चांगले कव्हर मिळणे महत्त्वाचे आहे.
👉किती कव्हर असणारा टर्म प्लॅन खरेदी करावा?
तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 15 ते 20 पट टर्म प्लॅन चे cover असले पाहिजे हा एक सामान्य नियम आहे.
परंतु खलील गोष्टीसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे जसे :-
1) वर्तमान + भविष्यातील खर्च
2) विविध प्रकारच्या कर्जाची रक्कम
3) भविष्यात तुमचे जे ध्येय(Goals) त्यासाठी लागणारी रक्कम
4) मुलांच्या शिक्षणासाठी खर्च + इतर
या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला किती रकमेचा टर्म प्लॅन पाहिजे हे समजेन .
👉किती वयापर्यंत टर्म प्लॅन घेतला पाहिजे ?
खुप लोकांना असे वाटते की त्यांना वयाच्या ९९ व्या वर्षापर्यंत संरक्षण मिळावे.
भरलेल्या प्रीमियमवर अनिवार्य परतावा मिळवण्यासाठी ते असे करतात.
टर्म प्लॅन तुम्हाला फक्त तोपर्यंत पाहिजे जोपर्यंत:-
✅तुमच्यावर कोणीही अवलंबून नाही , मुलांच शिक्षण ,लग्न अश्या सर्व जबाबदर्या पार पडल्या आहेत
✅तुमच्यावर आता कोणतेही मोठे कर्ज नाही .
✅तुमचे वय आता 60 आहे आणि निवृत्ती घेतली आहे .
त्यामुळे जास्तीत जास्त 60 ते 65 वर्षापर्यंत टर्म प्लॅन घेतला पाहिजे कारण तोपर्यंत सर्वकाही जबाबदर्या पूर्ण होऊन निवृत्तीसाठी रक्कम शिल्लक राहिलेली असते . ( जर तुम्ही पहिलाच निवृत्ती नियोजनाचा प्लॅन केला असेल तर) .
तुम्ही जर 60-65 पेक्षा जास्त कव्हर घेतला असेल तर Naturally मृत्यूचा धोका वाढतो आणि त्यामुळे लाइफ इन्शुरन्स कंपन्या टर्म प्लॅनचे प्रीमियम वाढवतात ज्याची खरच गरज नाही .
काहीजण यातपण जवळपास दुप्पट पैसे देऊन Return of premium असे option निवडतात ज्यात विमाधारकाला काही झाले नाही तर भरलेली सर्व रक्कम परत मिळते . पण यामध्ये मिळणारा परतावा हा FD पेक्षा खूपच कमी असतो.
त्यामुळे असे न करता Pure Term Plan खरेदी करावा आणि जी जास्त रक्कम Return of premium मध्ये जाणार होती त्याची एक SIP म्यूचुअल फंड मध्ये चालू करावी जेणेकरून आपल्याला जवळपास Return of premium पेक्षा 5 ते 10 पट रक्कम जास्त मिळते .
Term Plan with Return of Premium (TROP) यावरील सविस्तर माहिती आपल्याला टर्म प्लॅन भाग -3 मध्ये लवकरच वाचायला भेटले ...
“लक्षात घ्या टर्म प्लॅन हा जीवनाच्या जोखमीपासून बचाव करण्याचे साधन आहे खात्रीपूर्वक परतावा मिळवण्याचे ते साधन नाही.”
👉रायडर्स:-
टर्म प्लॅनमध्ये मध्ये अनेक रायडर्स उपलब्ध आहेत त्यामधील हे महत्वाचे-
1) Critical illness Benefit-
पॉलिसीमध्ये सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाल्यास आपण हा rider वापरू शकतो. यात नमूद केलेली ठराविक रक्कम तुमहाला आजारातून बरे होण्यासाठी दिली जाते . गंभीर आजार रायडर निश्चित रोख लाभ देऊन असे आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत करतो.
2) Waiver of premium on critical illness (गंभीर आजारावरील प्रीमियमची सूट):-
तुम्हाला सूचीबद्ध गंभीर आजाराचे निदान झाल्यास किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास आपण हा Rider वापरू शकतो यामध्ये आजारचे निदन झाल्यापासून चे पुढचे सर्व टर्म प्लॅन चे प्रीमियम माफ होऊन जाते .
3)Accidental Death Benefit Rider :-
यात कोणत्याही कारणाने अपघात झाल्यास जर पॉलिसीधारकाचा मृत्यू होत असेल तर मूळ टर्म इन्शुरेंसव्यतिरिक्त एक ठराविक रक्कम या Rider मध्ये मिळते.
उदाहरण - Mr. A यांच्याजवळ एक करोड रुपयाचा टर्म प्लॅन आणि 50 लाखाचा Accidental Death Benefit Rider आहे. Mr. A यांचा मृत्यू जर अपघाताने झाला तर Mr. A यांच्या कुटुंबाला 1 करोड टर्म प्लॅनचे + 50 लाख Accidental Death Benefit Rider चे असे 1.50 करोड रुपये भेटतील .
4)Accidental Disability Rider :-
या इन्शुरेंस रायडर मध्ये जर पॉलिसीधारकाला संपूर्ण किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक ठराविक रक्कम तुमच्या उत्पन्नात झालेली हानी भरून काढण्यासाठी दिली जाते . ही रक्कम पॉलिसीधारकला किती अपंगत्व आले आहे यावर अवलंबून असते .
निष्कर्ष:-
👉टर्म प्लॅन हा एकमेव जीवन विमा तुमच्या फायद्याचा आहे जो की तुम्ही घेतलाच पाहिजे .
👉 तुम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजे 60-65 वर्षापर्यंतच टर्म प्लॅन घ्या .
👉ज्या policy मध्ये Return + Insurance अस आहे त्या Policy मध्ये कधीही गुंतवणूक करू नका
👉टर्म प्लॅन घेताना तुमचे उत्पन्न, उद्दिष्टे आणि दायित्वाचे मूल्यांकन करूनच टर्म प्लॅन चे कव्हर घ्या .
धन्यवाद 🙏
धिरज भराट
( IRDAI नोंदणीकृत विमा सल्लागार )
अर्थफ्रीडम
Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे. तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.
Post a Comment