Term Plan जीवन विमा 🧬 

Term Plan हा एक विम्याचा सर्वात स्वस्त प्रकार आहे. 

Term plan सोप्या शब्दात :- जर घरातल्या प्रमुख व्यक्तीला काही झाले ( मृत्यू ) तर एक मोठी रक्कम त्याच्या कुटुंबाला या जीवन विम्यामधून भेटते ,जेणेकरून त्यांचे उर्वरित आयुष्य कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय जाईल .


Term Plan सोडून दूसरा कोणताही जीवन विमा तुमच्याकडे असेल तर एकदा Review करून Term Plan काढून घ्या. पारंपरिक जीवन विम्यामध्ये तुमचा फायदा नसून समोरच्या व्यक्तीचा फायदा आहे जसे :- Moneyback Plan, Endwoment प्लान,ULIP, इतर ..

अश्या प्रकारचे प्लॅन जास्त करून मुलांच्या नावाखाली विकले जातात जसे लग्न, शिक्षण आणि मुलांना जीवन विमा दिला जातो ज्याची त्यांना कधीच गरज नाही .ज्या व्यक्तीवर घराची जबाबदारी आहे त्याच व्यक्तीचा फक्त जीवन विमा हवा . महिन्याला दहा हजार भरा , वर्षाला 5 लाख भरा . मुलाच्या 15 वर्षी शिक्षणासाठी इतकी रक्कम भेटेल , 20 वर्षांनंतर  इतकी  भेटेल आणि 25 वर्षांनंतर कायम एक विशिष्ट रक्कम  चालू राहील हे  फक्त  एक मार्केटिंग आहे  . सद्यपरिस्थितीनुसार  बघितलं गेल तर या सर्व प्लॅन चे रिटर्न हे 4 ते 5.5 % पर्यत असतात जे की महागाई पेक्षा खूप कमी आहेत आणि एक सामान्य माणूस या प्रकारच्या जाळ्यात अडकत चालला आहे.

अश्या प्रकारचे प्लॅन कसे काम करतात याबद्दल मी अगोदरच्या लेखामध्ये सविस्तर  लिहिले आहे, एकदा नक्की वाचा 👉

 पारंपरिक जीवन ( Traditional Life Policies ) विमा तुम्ही का नाही घेतला पाहिजे ? - Mis-selling Policies

खालील प्रश्न स्वत: ला विचारा

1) आपण किती रक्कम जीवन विम्यामध्ये आता भरत आहोत  आणि जीवन विम्याचे Cover किती आहे ?

 2) याच रकमेमध्ये मध्ये किती Cover असणारा term plan मिळू शकतो?

 3)चालू विमा पॉलिसी किती वर्ष लॉक आहे ? 

4) आपल्याला गुंतवणूक करायची होती की कुटुंबासाठी जीवन विमा पाहिजे होता ?

पारंपरिक जीवन विमा मध्ये कुटुंबाला 2 ते 5 लाख रक्कम भेटते . आपण जर  हयात नसलो तर यात कुटुंबाचे आर्थिक नियोजन होईल का जसे -मुलांचे शिक्षण, लग्न, पत्नीचे निवृत्ती नियोजन, काही कर्ज असतील तर ,अजून इतर ....

"आपण नसल्यावर टर्म इन्शुरेंस कुटुंबाला दुसर्‍याकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरू देत नाही "

वर्षाच्या पगाराच्या कमीत कमी 20 पट तरी टर्म प्लॅन असायला हवा. उदाहरण- एखाद्याचा पगार 5 लाख असेल तर त्याचाकडे 75 लाख ते 1 करोड चा टर्म प्लॅन असल्याला हवा .जेणेकरून जर विमाधारक हयात नसेल तर कुटुंबाच्या सर्व गरजा या पैश्यातून पूर्ण होतील .

"सर्वात कमीत कमी रक्कम भरून जास्तीत जास्त रकमेचे कवच देणारा जीवन विमा म्हणजे टर्म plan. "

उदाहरण :- 30 वर्ष वय असलेल्या व्यक्तीला जर 1 करोड चा टर्म प्लॅन हवा असेल तर वर्षाला त्याला फक्त 9000 ते 10000 भरावे लागतील .


"लक्षात घ्या टर्म प्लॅन गुंतवणूक नाही तो एक खर्च आहे त्यात गुंतवणूक शोधू नका ."

 Note :-

 ☑️टर्म प्लॅन घेताना pure टर्म प्लॅन घ्या . 

❎बाजारात रिटर्न ऑफ प्रीमियम , Limited Pay अश्याप्रकारचे प्लॅन आहेत ते घेऊ नका . 

धन्यवाद 🙏 

Arthfreedom TM

लेख - धिरज भराट

( IRDAI  नोंदणीकृत  विमा सल्लागार )

 Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

Post a Comment

Previous Post Next Post