🔵 Why should you start Investing early ?  

गुंतवणुकीला💸 लवकर सुरवात करणे का गरजेचे आहे ?  


10000 रुपये रकमेची SIP जर आपण प्रत्येक वर्षी आज करू उद्या करू करत गेलो तर भविष्यात आपली रक्कम किती कमी होऊ शकते?  

खलील उदाहरणावरून पाहू . 





वरील फोटो मध्ये  पाहू शकता - ( फोटो वर क्लिक करून स्पष्ट बघा )

Mr. A,B,C हे तीन गुंतवणूकदार आहेत.

 Mr. A यांना नोकरीच्या सुरवातीलाच चक्रवाढ व्याज कसे काम करते हे समजून घेऊन लगेच वयाच्या 25 व्या वर्षी 10000 ची रुपयाची SIP वयाच्या 55 वर्षापर्यंत चालू करतात 

तेच Mr.B जास्त काही आर्थिक नियोजन समजून न घेता उशिरा म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी सिप चालू करतात .

Mr. C हे Mr. A आणि Mr.B यांची बचत करून वाढलेली रक्कम बघून ( Portfolio ) वयाच्या 35 व्या वर्षी SIP चालू करतात .

 ✅तिघांनीही  12% परतावा या दराने 10000 रुपयाची SIP वयाच्या 55 वर्षापर्यंत  केली पण सर्वांमध्ये झालेला बादल खूप वेगळा होता.

👉Mr. A यांच्याकडे जवळपास 3.08 करोड 💸रुपये जमा झाले .🚀

 👉Mr. B यांनी 5 वर्ष उशिरा गुंतवणूक केल्यामुळे जवळपास 1.70 करोड रुपये जमा झाले. 🚀म्हणजे Mr. A पेक्षा 1.38 करोड कमी.
 
👉Mr. C यांनी 10 वर्ष उशिरा ⏰गुंतवणूक केल्यामुळे जवळपास 92 लाख रुपये जमा झाले. म्हणजे Mr. A पेक्षा 2.16 करोड कमी आणि Mr. B पेक्षा 78 लाख कमी.

✅ तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी SIP लवकर चालू करा .( कमीत कमी 500 रुपयाची पण SIP करू शकता  ) . जसे जसे उत्पन्न वाढेल तशी SIP ची रक्कम वाढवत चला . 

लक्षात घ्या महागाई पेक्षा जास्त परतावा तुम्हाला हवा असेल तर Equity म्यूचुअल फंड शिवाय दूसरा कोणताही पर्याय नाही.   ( उदाहरणं – समझा महागाई 6 % चालू आहे आणि तुम्हाला  10 ते 12 % परतावा Long Term गुंतवणुकीवर हवा असेल तर Mutual Fund मध्येच गुंतवणूक करावी लागेल कारण बाकीचे गुंतवणुकीचे पर्याय 6-7% पेक्षा जास्त परतावा देत नाहीत जो की महागाई बरोबर आहे  ) 

🔵 लवकर सुरवात केल्याने  चक्रवाढ व्याजाचा फायदा जास्त होतो , कमी amount मध्ये जास्तीत जास्त संपत्ती तयार होण्यास मदत होते . 

   संपत्ती निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्वाच काही असेल तर ती आहे "वेळ"⌛

 SIP एक बचत करण्याचा सर्वात उत्तम पर्याय आहे  जे तुम्हाला पैशासोबत मानसन्मान , सामाजिक प्रतिष्ठा मिळवुन देते ज्याचे तुम्ही हकदार असतात.  

 

धन्यवाद 🙏


धिरज भराट
AMFI नोंदणीकृत  म्यूचुअल फंड  सल्लागार )

अर्थफ्रीडम

Disclaimer Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. तसेच वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे. तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

Post a Comment

Previous Post Next Post