महत्वाचे ( Health Insurance )
आरोग्य विम्यासाठी ऐतिहासिक परिपत्रक
IRDAI ने एक नवीन परिपत्रक जारी केले आहे आणि त्याचा भारतातील करोडो लोकांना फायदा होणार आहे
👩⚕आयआरडीए किंवा इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही भारतातील इन्श्युरन्स क्षेत्रातील कार्याचे नियमन करणारी शीर्ष संस्था आहे.
आयआरडीएचा प्राथमिक उद्देश पॉलिसीधारकांचे स्वारस्य सुरक्षित ठेवणे आणि देशात इन्श्युरन्सची वाढ सुनिश्चित करणे हे आहे. जेव्हा इन्श्युरन्स इंडस्ट्रीचे नियमन करण्याची वेळ येते. तेव्हा आयआरडीए लाईफ इन्श्युरन्स सोबतच जनरल इन्श्युरन्स क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचाही विचार करते.
काही महत्वाचे बदल खलील प्रमाणे
1)कॅशलेस
पहिले आणि सगळ्यात महत्वाचे कॅशलेस उपचारासाठी केवळ 1 तासात विमा कंपनीला यासंबंधीच्या विनंतीला मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यामुळे रुग्णावर त्वरीत उपचाराला सुरुवात करता येणार आहे. IRDAI च्या या निर्णयामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना सुरुवातीच्या उपचारासाठी भलीमोठी रक्कम जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.
तसेच उपचार झाल्यानंतर पुढील तीन तासांतच विमा कंपन्यांना Discharge approval द्यावे लागणार आहे. त्यामुळे रुग्णालयाकडून पैसा मिळविण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांना दिला जाणारा ताप कमी होईल. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर घरी जाऊ शकेल.
2) खालील प्रकारचे Products इन्शुरेंस कंपन्यांनी उपलब्ध करून द्यावेत..
📌सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी इन्शुरेंस Product हवे.
📌पहिला कोणताही आजार इन्शुरेंस मध्ये Cover असल्याला हवा.
📌Daycare , ओपीडी, Home Care Treatment.
📌अपंग व्यक्ति
3) हेल्थ इन्शुरेंस मध्ये खालील प्रकारच्या therapy / surgery चे Cover असलायला हवे.
📌Brain simulation therapy
📌Robotic surgery
📌Chemotherapy/Immunotherapy
📌And all advanced surgeries
4) Free look period = 30 Days
ग्राहकांना पॉलिसी रद्द🙅 करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाईल.
5) Grace period
पॉलिसीच्या Renewal नंतर 30 दिवसांचा वाढीव कालावधी लागू होईल.
३० दिवसांच्या आत प्रीमियम भरल्यास सर्व फायदे पुढे केले जातील.
6) मोरेटोरियम कालावधी
हा असा कालावधी आहे ज्यानंतर Claims नाकारले जाऊ शकत नाहीत. (फसवणूक वगळता)
IRDAI ने त्यात बदल करून हा कालावधी 8 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत आणला आहे.
खलील लिंक वर क्लिक करून तुम्ही detailed PDF पाहू शकता
धन्यवाद🙏
असेच महत्वाच्या महितीसाठी अर्थफ्रीडम बरोबर Connect रहा.
Dhiraj Bharat
Post a Comment