आर्थिक नियोजन करणे खरच अवघड आहे का ?
एक सामान्य माणूस ज्यावेळेस आर्थिक नियोजनाबद्दल बोलतो
त्यावेळेस अस गुहीत धरतो कि आर्थिक नियोजन करणे खुप कठीण काम आहे कोण बेरीज ,बाजाबाकी ,महागाई यांचे आकडेमोड करत बसणार तसेच यासाठी खुप महागडे SOFTWARE
पण आपल्याकडे असायला लागते बरोबर त्यासाठी मी
खुप सोप्या भाषेत आर्थिक नियोजन कसे करायचे हे सांगत आहे .
आपण असे गृहीत धरू कि
एखादा व्यक्ती सरासरी १०००० रु प्रत्येक महिन्याला वाचवतो तर तो त्याचे आर्थिक
नियोजन कसे करू शकतो ?
चला तर पाहूया
आर्थिक नियोजन करण्यासाठी
आपल्याजवळ काही माहिती असणे गरजेचे आहे ती माहिती आपण खालील उदाहरणावरून पाहू :-
रुपेश नावाच्या व्यक्तीचे
वय ४० असून पत्नी आणि एक छोटा मुलगा असे त्याचे कुटुंब आहे . रुपेश हा निर्व्यसनी
असून ( Non –Smoker & Drinker ) प्रत्येक महिन्याला भविष्यासाठी दहा हजार रुपयाची बचत करत आहे म्हणजे वर्षाला
एक लाख वीस हजार रुपये. रुपेश वाचवलेले १०००० रुपये एकतर विमा policy , भिशी , महागाई पेक्षा कमी परतावा देणारे पर्याय किवा लालच दाखवून 1 ते २ वर्षात तुमचा पैसा दुप्पट यासारख्या
फसव्या योजनेत टाकू शकतो किवा खालील प्रमाणे एक स्मार्ट आर्थिक नियोजन करू शकतो .
स्टेप 1 ) रुपेश वर्षाला ८९०९ ( महिन्याला ७४२ ) रुपये
भरून आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक चांगला ५० लाख cover असलेला एक टर्म इन्शुरस खरेदी करू शकतो म्हणजे
तरुण वयात कुटुंबाची जबाबदारी असताना जर रुपेश च्या शरीराने साथ सोडली ( मृत्यू )
तर त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी भेटतील .
स्टेप २) रुपेश वर्षाला
१३५६८ ( महिन्याला ११३० ) रुपये भरून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेसाठी एक
चांगला ५ लाख cover असलेला एक हेंल्थ
इन्शुरस खरेदी करत आहे ज्याचा फायदा कधी Covid-१९ , अपघात ,गंभीर आजार किवा एखादी surgery यामुळे हॉस्पिटल मध्ये भारती झालो तर लाखो रुपयांचा
होणारा यावर खर्च आपला वाचेल .
स्टेप ३ ) आता रुपेशकडे जवळपास वर्षाला ९७५२३ रु ( = १२०००० – ८९०९ - १३५६८ ) म्हणजे महिन्याला ८१२७ रुपये त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी आहे . रुपेश एका चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने ८१२७ रु महिन्याला SIP ( Systematic Investment Plan ) मध्ये गुंतवत आहे आणि आपण असे गुहीत धरू शकतो कि रुपेश ला सरासरी १२% वार्षिक परतावा जर पुढील २० वर्षासाठी भेटला तर रुपेश कडे जवळपास ७५००००० ( ७५ लाख रुपये ) जमा होतील . इथे एक लक्षात ठेवायला हवे कि रूपेशने २० वर्षामध्ये नाही SIP वाढवली म्हणजे ८१२७ जेवढी आहे तेवढीच ठेवली आणि नाही कमी केली पण जर रूपेशने जसा त्याचा पगार आणि महागाई वाढत आहे तशी SIP जर १०% ने प्रत्येक वर्षी वाढवली असती तर त्याच्याकडे जवळपास चक्रवाढ व्याजामुळे १६१६३५५० ( एक करोड ६१ लाख ) जमा होतात हीच तर जादू आहे योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करण्याची .
गुंतवणूक करणे एक
दीर्घकालीन प्रक्रिया आहे.
"जर तुमच्याकडे कोणतेही
कुटुंबासाठी संरक्षण नसेल ( टर्म + हेल्थ ) आणि तुमची SIP किवा कोठेही गुंतवणूक चालू असेल तर नेहमी लक्षात ठेवा
कदाचित तुमच्याकडे आर्थिक अभ्यास असेल पण आर्थिक नियोजन नाहीये "
रूपेश चे आर्थिक नियोजन – १०००० रुपये महिन्याला गुंतवणूक
1 💥 ५० लाखाचे संरक्षण असलेला एक टर्म इन्शुरस ( Family Protection )
2 💥 ५ लाखाचा आरोग्य विमा ( Income Protection )
3 💥 SIP पद्धतीने भविष्यासाठी गुंतवणुकीच्या सर्वात
चांगल्या पर्यायामध्ये गुंतवणूक
लेख आवडला तर आपला अभिप्राय नक्की कळवा
तुमचे काही प्रश्न असतील
तर मला whatsapp करा तसेच तुम्ही
आता कोठे गुंतवणूक करत आहात किंवा कोणते कुटुंबासाठी संरक्षण केलेले आहे नक्की
कळवा म्हणजे काही बदल असेल तर मी तुम्हाला reply करेन .
धन्यवाद.
लेख- धिरज भराट
MFP,EFP,MFD
( लेखक विमा आणि म्युचुअल फंड वितरक
आहेत )
( Mutual funds are subject to market risk please read all documents carefully
before investing )
Note - इथे मी माझे वैयक्तिक अनुभव मांडत
आहे. ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या
आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या
Post a Comment