आपत्कालीन निधि (Emergency Fund)

 नमस्कार🙏,

_आशा करतो आपण सर्व ठीक आहात._

      दोन महिन्यापेक्षा जास्त काळ झालाय आपण lockdown मुळे घरात आहोत. बर्‍याच लोकांना पगार नाही काम बंद आहे, कोणाच्या नोकर्‍या गेल्या तर काहींना नोकरी जाण्याची भीती वाटत आहे. ज्यांचे आज कामवायचे आणि आज खायचे असे होते ते स्वत:च्या गावी गेलेत अजून किती दिवस हे चालेल कोणालाच माहिती नाही ,जवळचे सगळे पैसे संपत आले आहेत अश्या भयंकर परिस्थितीत आपत्कालीन निधिचे (Emgergency Fund ) महत्व आणि आपले आर्थिक नियोजन करणे किती महत्वाचे हे जाणवू लागले आहेत.

      आपत्कालीन निधि म्हणजे काय तर, तुमचा 6 महिन्याचा घरचा खर्च अश्या ठिकाणी ठेवणे जिथे तुमहाला लगेच काढता येईल यामध्ये वैद्यकीय खर्च, विमा हप्ते, लोनचे हप्ते, मुलांची शाळेची फी, वीज बिल, गुंतवणूक ,प्रवास खर्च इत्यादी अधिक आपले वैयक्तीक खर्च समाविष्ट असतात म्हणजे ,एखाद्याचा घरचा खर्च महिना 25000 रुपये आहे तर 25000 X 6 महीने म्हणजे 150000 रुपये हा त्याचा Emergency fund झाला, उद्या काही कारणास्तव (नोकरी जाणे, अपघात किंवा आजच्या सारखी कोरोना सदृश्य महामारी) आपल्या नोकरीवर व्यवसायावर किंवा इतर मिळकतीवर गदाआली तर  काय? तर हीच ६ महिन्याची पुंजी आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि यालाच आपण आपत्कालीन निधी किंवा संकट समयी उपयोगी येणारा पैसा असे म्हणतो.

          6 महिन्याचा आपत्कालीन निधी कोठे ठेवला पाहिजे ? तसे तुम्ही FD, RD या मध्येही ठेवू शकता पण मी स्वत: Mutual Fund च्या liquid फंडात ठेवतो कारण यात पैसे टाकणे आणि काढणे खूप सोपे आहे अगदी एका click वर , liquid Fund म्हणजे सोप्या भाषेत तुमचे असणारे Saving Account पण तुम्हाला saving account वर 3 ते 4% व्याज भेटते तसे liquid फंडात 6 ते 7% व्याज भेटते, याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुम्ही जितके दिवस पैसे ठेवता तेवढ्या दिवसाचे व्याज भेटून जाते से FD, RD मध्ये नाही भेटत, FD जर एक वर्षाची असेल आणि मध्येच तुम्ही 2 महिन्यानी रक्कम काढून घेतली तर ठरलेले व्याज नाही भेटत. Liquid फंडात आपल्या क्षमतेनुसार आणि ध्येयानुसार गुंतवणुक करू शकतो( मासिक किंवा एकरकमी किंवा जशी जमेल तशी) जेणेकरून वरील समस्येवर तोडगा काढू शकतो. बँकेशी तुलना केली असता निश्चितच अधिक परतावा आणि बँके इतकेच सुरक्षित, कर लवचीकता व कधीही पैसे काढण्याची मुभा अशी तरलता असलेले Liquid फंड आपण आपल्या आपत्कालीन निधी करीता निश्चित वापरू शकतो.
       आर्थिक नियोजनाची सर्वात पहिली पायरी म्हणजे आपत्कालीन निधि असणे , खूप लोक याकडे दुर्लक्षित करतात त्यांना वाटते असा प्रसंग आपल्यावर नाही येणार , आपला Job कायम असेल, business कायम चालेल पण असे होत नाही पण आज आपण ती परिस्थिति अनुभव करतोय यामधून काहीतरी शिकवण घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. खूप लोकांचे होम loan EMI , Car loan, Shares किंवा म्यूचुअल फंड मधल्या SIP बंद झाल्या, विमा हफ्ते बुडाले कारण घरात पैसे नाहीत योग्य ते नियोजन नाही केले म्हणून.

    Covid-19 ,Civid-20 ,Covid 21 ह्यासारखे अजुन खुप प्रसंग पुढील 20 वर्षात येणार आहेत. आपण त्यासाठी खरच तयार आहोत का विचारा स्वतःला? मी तर म्हणेन जोपर्यंत तुम्ही आपत्कालीन निधि नाही करत तोपर्यंत गुंतवणूक करू नका कारण गुंतवणूक करूनही उद्या अशी परिस्थिति आली की तुम्ही गुंतवणूक थांबवनार आहात मग त्या केलेल्या गुंतवणुकीला आणि ध्येयाला काहीच अर्थ नाही .

अजूनही वेळ गेलेली नाही योग्य ते आर्थिक नियोजन करून आनंदी जीवनाला सुरवात करा . 6 महिन्याचा आपत्कालीन निधि करायला कधीही विसरू नका कारण हाच तुम्हाला वाचवेल अश्या कठीण परिस्थितित .

स्वस्थ रहा, मस्त रहा, सुरक्षित रहा

तुमचे काही प्रश्न असतील तर मला whatsapp करा.

लेख-धीरज भराट
आर्थिक सल्लागार 


Note - इथे मी माझे वैयक्तिक अनुभव मांडत आहे. ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शेकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

मिशन - सामान्य मराठी माणसाला आर्थिक शिक्षण देऊन आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे.

'गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य' ह्या Facebook पेज ला Like, Follow करायला विसरू नका  तसेच आमच्या whatsapp Broadcast ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp Icon वर click करा.






Post a Comment

Previous Post Next Post