बचत आणि गुंतवणूक
यामधील फरक
नमस्कार,
आज आपण बचत आणि
गुंतवणूक यातील फरक पाहणार आहोत. ह्या दोघामधील फरक खूप लोकांना कळत नाही अगदी
उच्चशिक्षित वर्गाला सुद्धा. चला तर मग पाहूया यामधील अगदी सोप्या भाषेत फरक.
बचत अर्थात Saving म्हणजे – आपल्याकडील
असेलेले पैसे अश्या ठिकाणी ठेवावे जिथे कमीत कमी जोखीम व जास्तीत जास्त सुरक्षतात
असेल. बचत ही अशी प्रकिया आहे जिथे पैसे वाढत नाही आणि कमीही होत नाही त्याची
सुरक्षतता म्हंत्वाची असते. जसे आपल्यापैकी बहुतेक जन बचतीचे पैसे FD, Bank Saving Account, RD ह्या मध्ये ठेवतात पण
अश्याच ठिकाणी Long Term ( 10 वर्षानंतर
लागणारी रक्कम ) साठी लागणारे पैसे सुद्धा इथेच गुंतवतात हीच चूक त्यांना कधीच
संपत्ति निर्माण करू देत नाही.
बचत खात्यातील रकमेवर
मिळणारे व्याज हे कमी, म्हणजे दरसाल ४ टक्के इतकेच असते. काही बँकांमध्ये
ते किंचित अधिकही असू शकते. अर्थातच, बचत खात्यातील रकमांवर मिळणारा व्याजदर हा भाववाढीच्या दरापेक्षा
(‘इन्फ्लेशन’) नेहमीचा खूप खाली असतो.
आपण बचत खात्यात पैसे ठेवतो ते याच हेतूने
की पैसे सुरक्षित रहावेत आणि हवे तेव्हा वापरण्यासाठी उपलब्ध असावेत. समजा तुम्ही 100 रुपये ची नोट घरच्या
तिजोरीत ठेवली आणि एक वर्षाने ती बाहेर काढली तर तिचे मूल्य किती राहिले असेल ? तुम्ही म्हणाल 100 पण हे
चुकीचे आहे तिचे मूल्य हे 96 झाले असेल कारण, तुम्ही
महागाई विसरून गेलात. जी वस्तु तुम्हाला 100 रुपयात हयावर्षात भेटली ती वस्तु
पुढील वर्षात 104 रुपयाने भेटेल म्हणून गुंतवणूक महत्वाची आहे.
गुंतवणूक (Investing) मात्र बचतीपेक्षा
खूपच वेगळी आहे. आपल्या गुंतविलेल्या पैशांवर जास्तीत उत्पन्न (‘Return’) मिळावेत ही
गुंतवणूकदाराची अपेक्षा असते. भारतातील सर्व मध्यमवर्गीय लोक बचत करतात गुंतवणूक नाही. गुंतवणुकीपासून आजही
ते खूप लांब आहे. चुकीच्या बातम्यांमुळे त्यांना कायम बचत हीच गुंतवणूक वाटली आहे
म्हणून ते कधीच पैश्याने पैसा वाढवू नाही शकले.
गुंतवणूक ही 5 ,10,15,20 वर्ष अशी असते. जिथे पैसा आपण अश्या Instrument मध्ये गुंतवतो जिथे महागाईपेक्षा जास्त return
येतात. म्हणजे, समझा आता महागाईचा दर 5% चालू आहे तर आपल्याला अशा ठिकाणी पैसा गुंतववा लागेल
जिथे आपलयाला 10 ते 12% रिटर्न्स मिळतील तरच आपली संपती चक्रवाढ पद्धतीने वाढण्यास
मदत होईल.
बचत करून कोणी कधीच श्रीमत नाही होऊ शकत , त्यासाठी गुंतवणूक अतिशय महत्वाची.
गुंतवणूक ही वेग- वेगळ्या ध्येयासाठी असते. जशी तुमचे Retirement planning , मुलीचे लग्न, मुलांचे
शिक्षण, गाडी खरेदी करणे ,आर्थिक
स्वातंत्र्यासाठी संपत्ती जमवणे ही झाली गुंतवणूक आणि बचत म्हणजे पुढील काही
वर्षासाठी किंवा महिनासाठी लागणारी रक्कम. दोन्ही मध्ये खूप मोठा फरक आहे.
सामान्य माणसाची सगळ्यात मोठी चूक महागाईला विसरून जाने.
आपल्या गरजा लक्षात घेऊन बचत आणि गुंतवणूक यामध्ये पैसे ठेवावे. मी म्हणेन जे
पैसे तुमहाल 5 वर्षाच्या आत लागतात ते पैसे तुम्ही- FD, RD किंवा म्युच्युअल फंडाच्या liquid प्रकारात ठेवावे
जिथे तुमहाला Saving Bank Account पेक्षा 3,4 टक्के जास्त मिळतील पुढे आपण सविस्तर माहिती पाहू
याबद्दल.
जिथे तुमहाला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे म्हणजे 5,10,20 वर्ष तिथे गुंतवणूक -Real Estate, शेयर मार्केट , Equity म्युच्युअल फंड ,Gold ,Government Bonds, जमीन , स्वत:चा व्यवसाय ह्या मध्ये करावी. हे सगळे
संपत्ति निर्माण करणारे गुंतवणुकीचे प्रकार आहे. तुम्ही म्हणाल सर, ह्यामध्ये तर RISK आहे. RISK
सगळीकडे असते त्याबद्दल मी नंतर लेख लिहिलं पण आजच्या काळात RISK न घेणेच सगळ्यात मोठी RISK आहे.
मी अशा करतो की तुम्हाला बचत व
गुंतवणूक हयामधील फरक समजला असेल. तुमचे काही प्रश्न असतील ह्यावर तर मला मेसेज
किवा whatsapp करू
शकता.
लेख – धिरज भराट
मिशन - सामान्य मराठी माणसाला आर्थिक शिक्षण देऊन , आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे.
'गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य' ह्या पेज ला Like, Follow करायला विसरू नका
तसेच आमच्या whatsapp Broadcast ला जॉईन होण्यासाठी Blog वरील whatsapp icon वर click करून hi पाठवा .
Post a Comment